समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व आय आय आय टी कोट्यायम,केरळ यांच्यामध्ये सामंजस्य करार

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे व आय आय आय टी कोट्यायम,केरळ यांच्यामध्ये सामंजस्य करार : https://shivnerwarta.in/?p=12129
समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील व समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.अनिल कपिले आणि अटल इंक्युबेशन सेंटर-आय आय आय टी कोट्यायम, केरळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीलाल यांनी सदर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करून शिक्कामोर्तब केले.
या करारांतर्गत समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे हे नोडल सेंटर असणार आहे व त्या अंतर्गत समर्थ पॉलिटेक्निक या विद्यालयाचा समावेश करण्यात आलेला आहे.
विद्यार्थ्यांना हे मिळणार फायदे:
सदर सामंजस्य करारांतर्गत संकुलातील विद्यार्थ्यांना दोन्ही संस्थांकडून प्रकल्प करण्यासाठी व त्या-त्या विभागांमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी विविध प्रकारच्या आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असणारे सेमिनार,अल्प मुदतीतील अभ्यासक्रम,कौशल्य विकास कार्यक्रम तसेच जिल्हास्तरीय,राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळा आणि परिषद आयोजित करण्यात येणार आहेत.नवीन उद्योग,व्यवसाय कार्यक्रम यासाठी निर्माण होणाऱ्या संधी व त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published.

Your Comment*

Name*

Email*

Website

Follow by Email